पी.एम.जे.डी.वाय. खाते

पीएमजेडीवाय खाते

प्रधान मंत्री जन - धन योजना ( पी .एम. जे. डी. वाय. ) पी एम जे डी य हे वित्तीय सेवांमध्ये प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी , बँकिंग / बचत आणि ठेव खाती , प्रेषण , क्रेडिट , विमा , निवृत्ति वेतन हे परवडणाऱ्या पद्धतीने सुनिश्चित करण्यासाठी आर्थिक समावेशनासाठी एक राष्ट्रीय मिशन आहे. खाते कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा व्यवसाय प्रतिनिधी (बँक मित्र) आउटलेटमध्ये उघडले जाऊ शकते. पी. एम. जे. डी. वाय. पी एम जे डी य खाती शून्य शिल्लक ठेवून उघडली जात आहेत .

  • ठेवीवर व्याज
  • किमान शिल्लक आवश्यक नाही

पीएमजेडीवाय खाते

  • आर.बी.आय.च्या निर्देशांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी बी.एस.बी.डी. खातेधारकाने कोणत्याही बँक / शाखेत इतर कोणत्याही बचत बँक खाते ठेवू नये
  • रुपी योजनेंतर्गत रु. 1 लाखाचे अपघाती विमा संरक्षण आणि 28/08/2018 नंतर उघडलेल्या खात्यांसाठी अपघाती विमा संरक्षण रु. 2 लाखाचे आहे.
  • ही योजना लाभार्थीच्या मृत्यूनंतर पात्रतेच्या अटीच्या पूर्ततेच्या अधीन राहून रु. 30,000 जीवन सुरक्षा रक्कम प्रदान करते, म्हणजेच 15/08/2014 - 31/01/2015 दरम्यान उघडलेली खाती
  • संपूर्ण भारतात पैशाचे सुलभ हस्तांतरण
  • सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना या खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण मिळेल
  • 6 महिने खाते समाधानकारकरित्या सुरु राहिल्यावर ओव्हरड्राफ्ट सुविधेला परवानगी दिली जाईल

पीएमजेडीवाय खाते

  • पेन्शन, विमा उत्पादने उपलब्ध करून देणे
  • रुपे डेबिट कार्ड मोफत जारी करणे.
  • पी.एम.जे.डी.वाय. अंतर्गत वैयक्तिक अपघाती विम्याअंतर्गत दाव्याची रक्कम तेव्हाच देय असेल जेव्हा रुपे कार्डधारकाने अपघाताच्या तारखेपासून 90 दिवसांच्या आत बँकेच्या कोणत्याही चॅनेलवर बँकेअंतर्गत किंवा दोन बँकांमध्ये कमीतकमी एक यशस्वी आर्थिक किंवा गैर-आर्थिक व्यवहार केला असेल तर म्हणजेच आमच्यासहित (ए.टी.एम. / मायक्रो-ए.टी.एम. / पी.ओ.एस. / व्यवसाय प्रतिनिधी कोणत्याही पेमेंट माध्यमाद्वारे कोणत्याही ठिकाणी) किंवा बाहेरील (समान बँक चॅनेल - बँक ग्राहक / रुपे कार्डधारकाचे दुसऱ्या बँक चॅनेलवर व्यवहार.
  • रु. 10,000 पर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा प्रति घर केवळ एका खात्यात उपलब्ध आहे, शक्यतो घरातील महिला यासाठी आहे आणि रु. 2000 साठी विनात्रास ओव्हरड्राफ्ट उपलब्ध आहे.

पीएमजेडीवाय खाते

  • आधार कार्ड/आधार क्रमांक उपलब्ध असेल तर इतर कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. जर पत्ता बदलला असेल, तर सध्याच्या पत्त्याचे स्व-प्रमाणपत्र पुरेसे आहे.

जर आधार कार्ड उपलब्ध नसेल तर खालीलपैकी कोणत्याही अधिकृत वैध कागदपत्रांची (ओ.व्ही.डी.) आवश्यकता आहे:

  • मतदार ओळखपत्र
  • वाहनचालक परवाना
  • पॅन कार्ड
  • भारतीय पासपोर्ट
  • नरेगा कार्ड

वरील कागदपत्रांमध्ये तुमचा पत्ताही असेल, तर तो ओळख आणि पत्त्याचा पुरावा दोन्ही म्हणून काम करू शकतो.

जर एखाद्या व्यक्तीकडे वर नमूद केलेली कोणतीही 'अधिकृत वैध कागदपत्रे' नसतील, परंतु ती बँकांद्वारे कमी जोखमीची म्हणून वर्गीकृत केली गेली असेल तर तो / ती खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करून बँक खाते उघडू शकते:

  • केंद्र / राज्य सरकारचे विभाग, वैधानिक / नियामक प्राधिकरणे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, अनुसूचित व्यावसायिक बँका आणि सार्वजनिक वित्तीय संस्थांनी जारी केलेले अर्जदाराचे छायाचित्र असलेले ओळखपत्र
  • गॅझेट अधिकाऱ्याने जारी केलेले पत्र, त्या व्यक्तीचे विधिवत साक्षांकित छायाचित्र असलेले
Pradhan-Mantri-Jan-Dhan-Yojna-Account-(PMJDY-Account)