सुरक्षा विमा योजना
योजनेचा प्रकार
ऑटो डेबिट सुविधेद्वारे वर्षानुवर्ष (1 जून ते 31 मे) नूतनीकरण केलेली एक वर्षाची अपघाती विमा योजना, ग्राहकाचा मृत्यू किंवा अपघातामुळे अपंगत्व आल्यास अपघाती संरक्षण प्रदान करते.
बँकेचा विमा भागीदार
मेसर्स न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड
- विमा संरक्षण : अपघातामुळे ग्राहकाचा मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये देय आहेत. अंशत: अपंगत्व आल्यास 1 लाख रु.
- हप्ता: प्रति विमाधारक वार्षिक 20 रुपये
- पॉलिसीचा कार्यकाळ: 1 वर्ष, प्रत्येक वर्षी नूतनीकरण
- कव्हरेज कालावधी : 1 जून ते 31 मे (1 वर्ष)
सुरक्षा विमा योजना
सहभागी बँकांमध्ये 18 ते 70 वर्षे वयोगटातील बचत बँक खातेदारांना सहभागी होण्याचा हक्क असेल.
सुरक्षा विमा योजना
पी.एम.जे.जे.बी.वा.य आणि पी.ए.म.एस.बी.वा.य अंतर्गत नवीन नावनोंदणीसाठी सुविधा देखील आमच्या ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत
अनु. क्र. | पी.एम.जे.जे.बी.वाय. आणि पी.एम.एस.बी.वाय. योजनेअंतर्गत नावनोंदणीसाठी सुविधा | प्रक्रिया |
---|---|---|
1 | शाखा | शाखेत नावनोंदणी अर्ज सादर करून आणि खात्यात पुरेशी शिल्लक सुनिश्चित करून. (डाउनलोड फॉर्म विभागामध्ये फॉर्म उपलब्ध) |
2 | बी.सी. पॉइंट | बी.सी. किऑस्क पोर्टलमध्ये ग्राहकांची नोंदणी करू शकते. |
- https://jansuraksha.in वर लॉग इन करून सेल्फ सबस्क्राइबिंग मोडद्वारे ग्राहकाद्वारे नावनोंदणी
- शाखा आणि बीसी चॅनलद्वारे नावनोंदणी सुविधा
- इंटरनेट बँकिंगद्वारे नावनोंदणी सुविधा (टॅब विमा-पंतप्रधान विमा योजना).
- इंटरनेट बँकिंगद्वारे नावनोंदणी सुविधा (टॅब विमा-पंतप्रधान विमा योजना).
सुरक्षा विमा योजना
- एखाद्या व्यक्तीची एका किंवा वेगवेगळ्या बँकांमध्ये एकाधिक बचत बँक खाती असल्यास, ती व्यक्ती केवळ एका बचत बँक खात्याद्वारे योजनेत सामील होण्यास पात्र असेल.
- बँक खात्यासाठी आधार हे प्राथमिक केवायसी असेल. मात्र, योजनेत नावनोंदणी करणे बंधनकारक नाही.
- या योजनेंतर्गत कव्हरेज इतर कोणत्याही विमा योजनेंतर्गत संरक्षणाव्यतिरिक्त आहे, ग्राहकाला कव्हर केले जाऊ शकते.
तुम्हाला आवडेल अशी उत्पादने
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना (पीएमजेजेबीवाय)
एक वर्ष मुदतीची जीवन विमा योजना, वर्षानुवर्ष नवीकरणीय.
अधिक जाणून घ्याअटल पेन्शन योजना
अटल पेन्शन योजना ही भारत सरकारने सुरू केलेली एक सामाजिक सुरक्षा योजना आहे
अधिक जाणून घ्या